Posts

शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले समृध्दीचा महामार्ग

Image
                                                              शेततळ्यातील मत्स्यपालन ठरले  समृध्दीचा महामार्ग                                                                                                             करडा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संरक्षीत सिंचनाकरीता शेततळ्याच्या बहूविध उपयोगाची माहिती मिळाल्यानंतर आसेगाव (ता. रिसोड ,  जि. वाशीम) येथील सुनिल संजाबराव खानझोडे यांनी शेततळ्यात मत्स्यपालन सुरु केले. एवढ्यावरच न थांबता शेततळ्याच्या बांधावर तूर लागवड तसेच डाळींब शेती असा व्यावसायीक पॅटर्न या शेतकऱ्याने यशस्वी केला आहे....

पोल्ट्री उद्योग फायद्याचा

Image
      पोल्ट्री उद्योग फायद्याचा                                                                                                                            एकत्रित कुटुंबाची झाली मदत                                    उच्चशिक्षित मोहन शंकरराव साळुंके यांनी एकत्रित कुटुंबीयांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथे पोल्ट्री उद्योग उभा केला. शिक्षकाची नोकरी सोडून मोहन पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून व्यवसायाचे धडे गिरवू लागले आहेत. व्यवस्थापन चांगले ठेवण्यावर सर्वाधिक भर देणाऱ्या साळुंके यांचा हा उद्योग तरुणांना उभारी देणारा ठरला आहे. लातूर जिल्ह्यात औसा तालुका...

सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...!

Image
सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील                                                                        ब्रॅण्ड निर्माता...!     फाळेगाव थेट येथील युवा शेतकऱ्यांचा प्रवास. दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर असाध्य ही साध्य होते ,  हा विश्‍वास रुजविण्यात फाळेगाव थेट (ता. जि. वाशिम) येथील बालाजी कोरडे हा युवक यशस्वी झाला आहे.  10  वर्षापूर्वी दूधाळ जनावरांची खरेदी करीत हे दूध घरोघरी विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. याच व्यवसायात सातत्य ठेवत त्यांनी पाकीटबंध दूधाचा प्रकल्प उभारला. त्यांचा हा आशावाद निश्‍चीतच विदर्भातील शेतीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. असे आहे फाळेगाव थेट वाशिम पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फाळेगाव थेट या गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारावर आहे. याच गावातील बालाजी व गणेश कोरडे या दोन भावंडांनी शेतीपूरक व्यवसायासाठी पुढाकार ...

शेळी पालनाने आर्थिक विकास

Image
शेळी पालनाने आर्थिक विकास चंडकापूर (ता. राहुरी ,  जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड ,  योग्य खाद्य व्यवस्थापन ,  वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी ,  जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी ,  ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली. रोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल ,  याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला. 1)  परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन...

शेततळे योजना

Image
मागेल त्याला शेततळे योज ना                                                                                      दिनांक 9 फेब्रुवारी, 2016 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ”मागेल त्याला शेततळे” योजना मंजूर आणि महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटीची तरतुद. · “मागेल त्याला शेततळे” योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. · शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे” योजना घेण्यात येत आहे. · टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील 5 वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहिर केली आ...

शेतकऱ्यांनं जीवनदान देणारं ‘#बोअरवेल स्कॅनर’!

Image
गिरीश बद्रागोंड        शेतकऱ्यांनं जीवनदान देणारं ‘ # बोअरवेल  स्कॅनर’! देशातली ही सर्वसामान्य माणसं. त्यांच्या त्यांच्या गरजेतून त्यांनी काही संशोधन सुरू केलं. रुढार्थानं यातील कोणीही संशोधक नाही. काही तर अगदी अल्पशिक्षित. पण ही संशोधनं त्यांच्यापुरती मर्यादित न राहता हजारो लोकांसाठी उपकारक ठरली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण शोधानिमित्त राष्ट्रपतींनीही त्याचा गौरव केला आणि राष्ट्रपती भवनात त्यांच्या या उपयुक्त संशोधनाचं प्रदर्शन भरवलं. अशा प्रतिभावंतांची ही ओळख.. शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न म्हणजे पाणी. शेतात पिकं घ्यायची, तर त्यासाठी पाणी हवं. पावसाचा भरोसा नाही आणि पाण्याची दुसरी कुठली सोय नाही. त्यामुळे आजकाल बहुतांश शेतकरी आधार घेतात तो बोअरवेलचा. शेतात बोअरवेल खोदतात. पण कुठल्याही गावात, कुठल्याही शेतकऱ्याला, बोअरवेल खोदायची असली, तर तो काय करतो? - अनेकदा यासंदर्भात देवाच्या नाहीतर, कुठल्यातरी ‘बाबा’च्या भरोशावरच ‘रामभरोसे’ निर्णय घेतला जातो. यातले काही ‘बाबा’ कधी जमिनीला कान लावून बसतात (जमिनीतल्या पाण्याचा आवाज त्यांना ऐकू येतो म्हणे), कोणी...

शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव

Image
शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती स ूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. य...