शेळी पालनाने आर्थिक विकास
शेळी पालनाने आर्थिक विकास चंडकापूर (ता. राहुरी , जि. नगर) येथील भास्कर मुरलीधर पंडित यांनी शेतीला जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली. उस्मानाबादी शेळ्यांची निवड , योग्य खाद्य व्यवस्थापन , वेळेवर लसीकरण आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार करडे आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. शेळीपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. चंडकापूर (ता. राहुरी , जि. नगर) येथील भास्कर पंडित यांची अडीच एकर बागायती शेती आहे. कपाशी , ऊस आणि गहू ही मुख्य पिके. आठ वर्षांपूर्वी दुष्काळामुळे पीक लागवडीतून उत्पन्न मिळाले नाही. पुढे विहीरही आटली. रोजगारासाठी पंडित यांनी परिसरातील शेतकरी नामदेव वढणे यांच्याकडे रोजाने काम सुरू केले. या दरम्यान अतिश्रमांमुळे पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शेतीमध्ये पूर्ण वेळ राबणे अवघड झाले. अशा वेळी उत्पन्नासाठी काय करता येईल , याचा विचार करत असताना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला. 1) परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पंडित यांनी शेळीपालनास सन...
Comments
Post a Comment